पपई लागवड तंत्रज्ञान
पपई लागवड तंत्रज्ञान पपईच्या चांगल्या उत्पादनासाठी साधारण फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पपईची रोपे शेतात लावली पाहिजेत. एक एकरासाठी किमान हजार रोपे गरजेची असतात. अलीकडे शेतकरी संकरित पपई जातींची लागवड करताहेत. या जातीचे बियाणे महागडे आहे. त्यामुळे बियाण्याची किंमत पाहता दर्जेदार रोपनिर्मितीसाठी आपल्यालासुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. पपईच्या रोपांच्या निर्मितीसाठी थंडीच्या काळात बियाण्याची लागवड रोपांसाठी करत असल्यास पॉलिहाऊसचा वापर गरजेचा आहे. अन्यथा, 15 जानेवारीनंतर गारठा कमी झाल्यावर पपईच्या बियाण्याची रोपांसाठी लागवड करावी. लागवडी अगोदर बियाण्यास सर्वांत प्रथम आठ तास “जी.ए.3′ च्या (100 पी.पी.एम.साठी एक लिटर पाण्यात 100 मि.लि. जी.ए.-3 मिसळावे) द्रावणात भिजवून घ्यावे. आठ तासांनंतर बियाणे द्रावणातून काढून पांढऱ्या कपड्यात 15 मिनिटे घट्ट बांधू...